महाराष्ट्रसिनेमा

अनोखी प्रेमकहाणीचा ‘समरेणू’ चित्रपट आजपासून ” प्रेक्षकांच्या भेटीला

 

कोल्हापूरःअनिल पाटील

सम आणि रेणू यांची अनोखी प्रेमकहाणी असलेला व सुरवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय…या टॅगलाईनमधूनच कळतेय की, सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीत जबरदस्त ट्विस्ट असणार आहे. त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट त्यांना कोणत्या रंजक वळणावर घेऊन जाणार आहे, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अशा कथानकावरील ‘समरेणू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सम्या आणि रेणू यांची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी ‘समरेणू’मध्ये पाहायला मिळत आहे. त्यांच्या प्रेमात मोडता घालण्यासाठी संत्याची एंट्री होते आणि तिथून पुढे या तिघांचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. मनाला भारावून टाकणाऱ्या या प्रेमकहाणीत प्रेमाचा विजय होतो की ही प्रेमकहाणी अधुरी राहते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. तत्पूर्वी ‘समरेणू’च्या गाण्यांना संगीतप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘समरेणू’च्या शीर्षकगीतातील सम आणि रेणूचे नजरेतून व्यक्त होणारे प्रेमही खूप भावणारे आहे. त्यामुळे उत्तम कथानक आणि सुमधुर गाणी असलेला ‘समरेणू’ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात,” एका गावात घडणारी ही प्रेमकहाणी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. पहिलाच चित्रपट असल्याने थोडे दडपण आहे आणि तितकीच उत्सुकताही आहे. प्रेमाचा त्रिकोण असला तरी चित्रपटाची कथा वेगळी आहे. ‘सुरवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय’ या टॅगलाईननुसार चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांसाठी एक धक्काच असणार आहे. आत हा धक्का सुखद की दुःखद असेल, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.”

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत ‘समरेणू’चे लेखन महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्यांना कुणाल गांजावाला, नीती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा नामांकित गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची निर्मिती एम. आर. फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close