महाराष्ट्रसांगली
बिसूरचे भानुदास कांबळे यांचे निधन

सांगली : कालकथित भानुदास केरु कांबळे, (रिटायर पोलिस हवालदार मुंबई)सध्या राहणार यशवंतनगर सांगली.(मूळ गाव बिसूर) यांचे बुधवार दि.११/५/२२रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक १२/५/२२रोजी सांगली येथे दुपारी दोन वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुले,सुनील कांबळे (पोलिस हवालदार,मुंबई) अनिल कांबळे (पोलिस हवालदार, मुंबई) दोन सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.पुण्याणुमोदनाचा विधी यशवंतनगर सांगली येथील राहत्या घरी शनिवारी दिनांक १४/५/२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात येणार आहे.
Share