महाराष्ट्र

गॅस दरवाढ कमी करा, अन्य मागणीसाठी रिपाइची गवई गटाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 

कोल्हापूरःअनिल पाटील

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) जिल्हा कोल्हापूर व राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून या संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत पेट्रोल ने (120) रुपये लिटर टप्पा पार केला असून डिझेल (100) रुपये लिटर वर गेले आहेत. स्वयंपाकाचा गॅस हे 1000झाला आहे इंधन दरवाढ म्हणजे अप्रत्यक्षरीत्या सर्व वस्तूंची दरवाढ या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोना च्या संकटाने जनता त्रस्त आहे .त्या त महागाईचा मार सहन करावा लागत आहे. तरी शासनाने गॅस व इंधन दरवाढ त्वरित कमी करावे.2. खाद्यतेल व डाळीचे भरमसाठ दरवाढ कमी करा. 3.जातीच्या दाखल्यासाठी प्रांताधिकारी महसुली पुरावा मागतात ते रद्द करावा, संजय गांधी निराधार श्रावणबाळ या योजनेसाठी एकवीस हजार च्या उत्पन्नाची मर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा 50000 पर्यंत करावी.5. रेशन कार्ड नवीन नोंद झालेल्या कुटुंबांना रेशन मिळावे ,करवीर तहसील मध्ये विभक्त रेशनकार्ड देण्यात टाळाटाळ होत आहे त्वरित देण्यात यावे. .सार्थी च्या धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्याना आर्थिक शिष्यवृत्ती बा र्टी करून किंवा समाजिक सामाजिक न्याय विभागाकडून मिळावी( nmms)
:सर्व साखर कारखान्यामध्ये मागासवर्गीय अनुशेष त्वरित भरावा. शासनाने pmegp व cmegp आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध कर्ज योजना देण्यास शेड्युल बँक व अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे तरी त्याची चौकशी करावी .
सांगरूळ तालुका करवीर येथील गायरान गट नंबर 23 91 व 565 मध्ये अतिक्रमण झाले आहे ते पूर्वीच्या आदेशाप्रमाणे 7/12 पत्रक की नोंद व्हावे
सरव डे तालुका राधानगरी येथील पोलीस दूरक्षेत्र असून त्याची पडझड झालेली आहे तरी नवीन पोलीस स्टेशन इमारत व्हावे..
सिरसे तालुका राधानगरी येथील दोन साकवाची ची चौकशी व्हावी. :मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मध्ये भरीव वाढ करा. व दलितावर वाढते अत्याचार रोखण्यासाठी क डक अंमलबजावणी व्हावी सर्व मागण्यांची शासनाकडून पूर्तता झाली पाहीजे.
यावेळी पांडुरंग कांबळे. पी एस कांबळे ,भाऊसो काळे, तुकाराम कांबळे ,भीमराव कांबळे (सरवडे कर )अशोक कांबळे (पनोरी कर) एम आर कांबळे (कौलव) प्रकाश कांबळे (शिरसेकर) साताप्पा कांबळे (कागल )आर एस कांबळे, भिकाजी कांबळे ,सिद्धार्थ देशमुख युवा जिल्हा अध्यक्ष, नाथाजी कांबळे (पुंगाव) रंगराव कांबळे( नांदगावकर अशोक कांबळे .कुरुकली कर मधुकर कांबळे .आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close