आकुर्डे येथील त्रिमुर्ती विकास संस्थेच्या चेअरमनपदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमनपदी सुरेश सुतार यांची निवड
कोल्हापूरःअनिल पाटील
आकुर्डे( ता. भुदरगड) येथील त्रिमुर्ती विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रविंद्र कोंडीबा पाटील तर व्हा. चेअरमनपदी सुरेश निवृत्ती सुतार यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी श्री.बी.बी. शिंदे (सहकार अधिकारी श्रेणी १ ) हे होते.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणूकीत श्री ज्ञानदेव गोविंद कुंभार, भिमराव राजाराम भंडारी, दिलीप बापू शेणवी, सागर साताप्पा पोवार, आनंदा सखाराम कुंभार, साताप्पा आनंदा कुंभार, युवराज केरबा लोहार,धनाजी गणपती कांबळे, योगीता गजराज पाटील, विद्या रमेश भोसले, यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली..
केडीसीसी बँकेच्या सहकार्यातुन त्रिमुर्ती विकास संस्थेने कर्जदारांना कर्जाचा अनेक योजनांचा लाभ दिला असून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक संस्थेची वार्षिक उलाढाल आहे.
पुढील काळात सभासद विकासाच्या अनेक योजना राबवण्यात येतील अशी माहीती संस्थेचे संस्थापक नाथाजी पाटील यांनी दिली….
शेवटी आभार संस्थेचे सचिव सचिन शिंदे यांनी मानले…..