महाराष्ट्र

जांभळी ग्रामपंचायतीचा तत्कालीन ग्रामविकास आधिकारी हेमंत जाधव याला 7000 हजार रूपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले अटक

 

कोल्हापूरःअनिल पाटील

 

तक्रारदार यांनी शासनाने मंजूर केलेल्या घरकूल योजनेअंतर्गत घर बांधले असून हे घर बांधण्यासाठी असलेल्या चार कामगारांची मजूरीची रक्कम शासनाकङून मंजूर केली म्हणून खासगी इसम विशाल शंकर पाटील वय 29 याने स्वतासाठी 5000 रूपये लाचेची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांच्या घरकूलाची उर्वरीत थकीत रक्कम आरोपी हेमंत मधूकर जाधव वय 32 तत्कालीन ग्रामविकास आधिकारी ग्रामपंचायत जांभळी ता. शिरोळ जि कोल्हापूर’ सध्या नेमणूक ग्रामपंचायत कवठेसार” ता शिरोळ रा. पाटील मळा घर नं 1176″ वाॅर्ङ 8 इचलकरंजी ता. हातकणंगले यांच्यासाठी दोन हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसमाकङे देण्याची हेमंत जाधव यांनी सहमती दिली होती. त्यानंतर ही 7000 रूपये लाचेची रक्कम स्विकारतानां खासगी इसमास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज रंगेहाथ पकङले.


ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आधिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे” पो हे काॅ अजय चव्हाण”पो .ना विकास माने “पो ना नवनाथ कदम पो ना सूनिल घोसाळकर यांच्या पथकाने केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close