देश विदेश

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळी-निळी शाई ओतली

 

कोल्हापूरःअनिल पाटील

कर्नाटका ची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथील सदाशिवनगरातील हा व्हिडीओ आहे. तसेच भगव्याचा अवमान करण्याचे काम काहींनी चित्रदुर्गमध्ये झाले आहे. कोल्हापूरात लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याचे संदेश शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांकडून पाठविण्यात येत आहेत. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल केला आहे.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेक झाल्यानंतर काही दिवसांनी चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळण्यात आला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीवर शाईफेक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला अपमान देश अजिबात सहन करणार नाही. ह्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर बघायला मिळतील असा मेसेजही व्हायरल होत आहेत. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची सदाशिवनगर बंगळूर येथे विटंबना करण्यात आली आहे. तसेच चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळण्यात आला. त्याचा निषेध करत समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close