क्राईममहाराष्ट्र

“त्या” अपघातातील दोघांचा मृत्यू

पलूस प्रतिनिधी : सांगली- माधवनगर रोड वरुण जाणाऱ्या रस्त्यावरील स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पुतळ्याजवळ छोटा हत्ती टेम्पोने दुचाकी ला जोरात धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना गुरूवारी दोघांचेही निधन झाले .


विद्या नागराज विभूते (वय 30 राहणार आंबा चौक यशवंतनगर ) व प्रकाश कांबळे (वय 35 रा महावीर पार्क सांगली)
अशी मृतांची नावे आहेत. भरदाव वेगाने वाहन चालवण्याने हा अपघात झाल्याने पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृतांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!