महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

सांगली जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

 

 

        सांगली  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 19 मार्च 2024 तसेच माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 20 मार्च 2024 ते 23 मार्च 2024 व माध्यमिक शालान्त (इयत्ता 10वी) प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 1 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा इयत्ता 12 वी साठी  जिल्ह्यातील एकूण 51 परीक्षा केंद्रावर व इयत्ता 10 वी साठी एकूण 103 परीक्षा केंद्रावर होणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात अनुक्रमे दि. 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 व दि. 1 मार्च 2023 ते दि. 26 मार्च 2024 या कालावधीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशात म्हटले आहे,  परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार  किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!