सांगली

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करावी

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

सांगली, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांसाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित केलेला आहे. ही मोहिम दि. 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. पात्र मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
या कार्यक्रमानुसार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी केलेली आहे. जे मतदार दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करीत आहेत अशा मतदारांनी फॉर्म नं. 6, ज्या मतदारांची नावाची वगळणी करावयाची आहे त्यांनी फॉर्म नं 7, ज्या मतदारांचे नाव, पत्ता, चुकीचा फोटो इत्यादीबाबत दुरूस्ती करावयाची आहे अशा मतदारांनी फॉर्म नं. 8अ भरून आपल्या भागामधील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close