ताज्या घडामोडी

चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

शाहिर भूषण पुरस्कार शाहिर प्रकाशदादा ढवळे पुणे यांना जाहीर

तासगाव:
चिंचणी ता.तासगांव येथिल शाहिर महर्षी र.द.दिक्षित प्रतिष्ठान व महाराष्ट्र शाहिर परिषद सांगली जिल्हा यांच्या सहकार्याने क्रांतीशाहिर र.द.दिक्षित यांच्या 17 व्या पुण्यतिथी निमित्त दि.16 जानेवारी 2024 रोजी दत्त मंदिर चिंचणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायं 6 वाजता शाहिरी क्षेत्रातील कार्याबद्दल शाहिर प्रकाश दादा ढवळे पुणे यांना शाहिर भुषण पुरस्कार व हुशार व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पुरस्कार वितरण सोहळा साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सदाशिव भाऊ माळी लोकनियुक्त सरपंच चिंचणी व प्रमुख पाहुणे मा. डॉ.श्री.अच्युत जाधव चिंचणी व जनशाहिर दादा पासलकर पुणे, प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र शाहिर परिषद या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, रात्री 9 वाजता हि रात्र शाहिरांची हा मान्यवर शाहिराचा पोवाडा कार्यक्रम सादर केला जाणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठान प्रमुख श्री.काशिनाथ दिक्षित व जिल्हा अध्यक्ष शाहिर अनंतकुमार सांळुंखे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!