महाराष्ट्र

तळसंदे येथील डी वाय पाटील ”कृषी”चा बेस्ट इन्स्टिट्यूट’ने सन्मान

 

कोल्हापूरः अनिल पाटील

 

तळसंदे येथील डी. वाय. पाटील बी. टेक. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘बेस्ट कॉलेज ऑफ डिकेड वीच प्रोड्युसड द मोस्ट सक्सेफुल आलुमनी’आणि डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचा ‘बेस्ट एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप ‘नवभारत’तुमच्या वतीने कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानीटकर यांच्या हस्ते या दोन्ही संस्थांचा गौरव करण्यात आला.

शनिवारी मुंबईतील हॉटेल ऑर्चीड इंटरनेशनल येथे झालेल्या ‘नवभारत एज्युकेशन काँक्लेव्ह’मध्ये या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व प्र. पी. डी उके यांनी तर डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार व प्रा. अमोल गाताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नवभारतचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी, एमआयटीचे प्र-कुलगुरु प्रा.अनंत चक्रदेव आदी उपस्थित होते.

या दोन्ही महाविद्यालयांच्या मार्फत कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक शिक्षण व विविध प्रयोग राबवले जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शी संलग्न असलेल्या या दोन्ही महाविद्यालयाने आजपर्यंत शेकडो गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. यातील अनेक माजी वियार्थी राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत, तसेच अनेकजण विदेशातही नोकरी व्यवसाय करत आहेत. १० हून अधिक विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे गोल्ड मेडल जिंकले आहे. या दोन्ही महाविद्यालयांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी मिळवली आहे.

या सर्व कामगिरीची दखल घेऊन नवभारतने डी वय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘बेस्ट कॉलेज ऑफ डीकेड विच प्रोडूस मोस्ट सक्सेसफुल आलूमनी’ तर कृषी महाविद्याल्याला ‘बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज ऑफ द इयर’ ने गौरविण्यात आले.

*कौशल्य विकास योजना राबवाव्यात- लोढा*

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समृद्ध शैक्षणीक परंपरा असलेल्या डी वाय पाटील ग्रुपचा सन्मान करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे . या संस्थेने कौशल्य विकासासाठी योजना आखाव्यात. आपल्या मंत्रालयाकडून त्याला प्राधान्य व पाठबळ मिळेल अशी ग्वाही दिली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!