राजकीय

भिलवडी येथील नेते मंडळींची मोर्चेकरांकडे, कडकडीत बंदकडे पाठ : नुसतीच तोंडाला पाने पुसण्याचा धंदा

 

भिलवडी:- (अभिजीत रांजणे)-: अंकलखोप येथील पांडुरंग मधुकर सूर्यवंशी यांनी महामानवांवर व महान नेत्यांवर फेसबुकच्या माध्यमातून चुकीचा संदेश पाठवून बदनामी केली होती याबाबत भिलवडीसह आसपासच्या गावांमध्ये दोन दिवस चांगलेच वातावरण तापले होते. आज शनिवार रोजी भिलवडी, माळवाडी अंकलखोप येथील नागरिकांनी भिलवडी गावातून रॅली काढली होती मुख्य बाजारपेठेसह गावातील मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करत भिलवडी पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना गुन्हेगाराला शिक्षा द्यावी याबाबतचे निवेदन सादर केले. या मोर्चा व मागणीवेळी मुस्लिम आणि बौद्ध बांधव सहभागी झाले होते परंतु नुसतीच गावाची उठाठेव करणारे सर्वच पक्षाचे नेते मंडळी यांनी या भ्याड कृत्याकडे काळा डोळा करत मोर्चा कडे जाणून-बुजून पाठ फिरवली होती. नुसतीच तोंडाला पाने पुसण्याचा धंदा करणाऱ्या नेते मंडळी कडून पुन्हा हे दिसून आले.

अंकलखोप येथील पांडुरंग मधुकर सूर्यवंशी यांच्या वादग्रस्त संदेशाचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पसरले होते. या गोष्टीची लहानातल्या लहान लोकांना कल्पना होती व आहे त्याबाबतच्या दैनिकात बातम्याही आणि सोशल मीडियावर संदेशही पसरले होते परंतु भिलवडी येथील सर्वच पक्षातील नेते मंडळींनी या घटनेचा निषेध व्यक्त करून सामील होण्याची गरज होती परंतु नेहमीप्रमाणेच दलित समाज, मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना जाणून-बुजून कानाडोळा केला आहे का? हा प्रश्न दलित व मुस्लिम बांधवांना पडला आहे. नुसताच मताचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी पाया पडत राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणारे नेते मंडळी यांचा या आंदोलन कार्यकर्त्यांकडून चांगलेच प्रतिउत्तर मिळत आहे अशा प्रकारच्या लोकांतून चर्चा होत आहे. शेजारच्या अनेक गावांतून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे सर्वच पक्षाचे लोक सहभागी होत आहेत परंतु आरपीआयचा पक्ष वगळता भिलवडी गावातील नेते मंडळींनी सहभागी होण्याची गरज होती ते मात्र यात सहभागी झाले नाहीत.

येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या बिनकामी नेते मंडळींची चांगलेच जिरवणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांत जोरदार उमटत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!