महाराष्ट्र

पुणे शिक्षक आमदार मतदारसंघातून  बाबासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल

सांगली : पुणे शिक्षक आमदार मतदार संघातून  बाबासाहेब पाटील यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला.

पाटील म्हणाले, की आपण सर्व सुज्ञ शिक्षकआपण भगिनींच्या बळावर, विश्‍वासावर व सदिच्छांवर आज मी पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातून मी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पदार्पण केले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत आवाज उठवत गेली वीस वर्षे अखंडितपणे लढा उभारला.
*’अन्याय घडो कुठेही चिडून उठू आम्ही*
*घाव पडो कुठेही तडफडू आम्ही’*
या न्यायाने शिक्षक बंधू भगिनींसाठी ठामपणे दृढनिश्चयाने आंदोलने, चळवळी, उपोषणांसारखा मार्ग अवलंबून त्या प्रश्नांची तड लावली आहे. आता मला आपली साथ हवी आहे. आपले प्रश्न, आपले हक्क प्रभावीपणे मांडण्यासाठी. आपल्या प्रलंबित मागण्या न्याय बाबींवर ठामपणे आवाज उठवण्यासाठी आपल्या सुज्ञ बंधू भगिनींचे प्रथम पसंतीचे एक मत व माझ्या पाठीशी असणाऱ्या सर्व संघटनांचे एकमत निश्चितच मला विजयी करतील. आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी मला देतील. आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आज मी उमेदवारी दाखल करीत आहे. लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, असे
त्ययांनी  स्पष्ट केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close