कृषी व व्यापारमहाराष्ट्र

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 18 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

        सांगली : पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना नविन स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारण्यास दि. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी दिली.

            या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच  दि. 26 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयातील ज्या 32 तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आलेले आहे असे तालुके वगळून 34 जिल्ह्यातील प्रति तालुका 1 याप्रमाणे 324 तालुक्यासाठी ही योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यास अनुसरून सन 2023-24 या वर्षासाठी 324 तालुक्यामधून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गोशाळांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत.

            या योजनेंतर्गत लाभार्थी गोशाळांची निवड मधील वेळापत्रकामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारणे 20 जुलै ते 18 ऑगस्ट 2023, जिलहास्तरावर छाननी करणे 18 ते 31 ऑगस्ट 2023, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांच्या स्तरावर छाननी करणे 15 ते 30 सप्टेंबर 2023. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयास प्रस्ताव सादर करणे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2023, आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय स्तरावर छाननी करणे 6 ते 31 ऑक्टोबर 2023 व प्रस्ताव शासनास सादर करणे 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023.

            याबाबात काही शंका असल्यास संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही डॉ. थोरे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!