ताज्या घडामोडी

भिलवडीचे सुपुत्र दिलीप रांजणे यांची कुंडलच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड

भिलवडी  दि.27: भिलवडीचे सुपुत्र दिलीप भरमा रांजणे (रा .भिलवडी,ता पलूस, जि. सांंगली  )यांची कुंडलच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड झाली आहे.

नेहमीच दिलीप रांजणे हे सामाजिक कार्यात सक्रिय असतात. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.  आजपर्यंत लेखणीक  म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक  सेवा बजावली आहे, त्यांच्या कामाचा अनुभव पाहून , त्यांच्या कार्याची दखल घेऊन कुंडल येथील गांधी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. दिलीप रांजणे यांच्या अनुभवाचा गांधी एज्युकेशन सोसायटीला नक्कीच फायदा होईल ,यात शंकाच नाही.
यावेळी दिलीप रांजणे म्हणाले ,मी आजपर्यंत लेखणीक म्हणून काम पाहिले आहे ,इथून पुढे माझ्या कामाचा अनुभव मी गांधी एज्युकेशन सोसायटी च्या उन्नती साठी घालावीन दिलेल्या संधीचे सोने करिन व प्रमाणिकपणे काम करिन .
निवडीबद्दल रांजणे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे . दर्पण मीडिया समूहाकडून दिलीप रांजणे यांचे अभिनंदन.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close