महाराष्ट्र

बेडग येथील भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या नावाची बांधणारी कमान पाडल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी : डॉ.सुशील गोतपागर यांची मागणी

 

पलूस:- सांगली जिल्हा बेडग ता.मिरज येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बांधत असणारी स्वागत कमान पाडल्या प्रकरणी दोषी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस चे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ सुशील गोतपागर यांचे नेतृत्वात पलूस तहसील कार्यालय यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले.

वास्तविक पाहता हा संवेदनशील विषय स्थानिक पातळीवर सामाजिक सलोख्यातून मार्गी लागणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही या प्रकरणी मिरज विधानसभेचे आमदार व विद्यमान पालकमंत्री यांनीही संवेदनशीलता न दाखवल्याने त्यांचाही कृतीचा निषेध करण्यात आला.बेडग येथील आंबेडकरी समाज आज मुलाबाळासह,तरुण,वृध्द सर्व सदर प्रकरणी उभ्या पावसात बेडग ते मुंबई लाँगमार्च काढत आहेत.त्यांना ही वेळ आली त्याला जातीवादी व बेजबाबदारपणे वागणारे शासन जबाबदार आहे. याची गभिर्यानी दाखल घ्यावी अन्यथा राज्यभर व देशभर काँग्रेस पक्ष व आंबेडकरी समाजाच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी पलूस प्रांतअधिकारी अक्षय शिंदे साहेब व तहसीलदार निवास धाणे साहेब यांना निवेदन देण्यात आले .यावेळी ज्येष्ठ नेते मिलिंद वांघमारे,रामचंद्र भंडारे,भीमराव कांबळे,सूरज मिसाळ,प्रमोद कांबळे,निवतृत्ती कांबळे, पवण सदामते,अरविंद कांबळे ,रोहित कांबळे,कुमार कांबळे यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!