वात आणि ती…!

Google+ Pinterest LinkedIn Tumblr +

तू जळत होतीस दिव्यात कणकण,
मंद प्रकाश पसरला तुझाच तुझ्याच अवतीभोवती चौफेर….

तीही जळत होती तुझ्यासारखीच अंतर्बाह्य,
अंधार तुडवत शोधीत होती नवी आयुष्याची वाट….

तू जळताना मागीत होतीस साथ पणतीतील तेलाला,
अहोरात्र द्यायचा होता तुला प्रकाश नवतेजाचा….

ती ही धडपडत होती चारी दिशा अंधाऱ्या होत्या तरी,
जागवायची होती तिला शक्ती तिच्यासारख्या तिची…..

तू जळत राहिलीस शांत वाऱ्यावादळातही,
संपता संपता त्यागाचा धडा देऊन गेलीस सकलास….

ती ही संपेल काळाबरोबर तुझ्यासारखीच,
पण धगधगती मशाल आसेल तिच्यासाठी ,तिच्यासारख्याच्या हाती…..

कवयित्री-रंजना सानप,
मायणी

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये