महाराष्ट्रराजकीय

सांगलीच्या जागेसाठी डॉ विश्वजीत कदम यांचा आक्रमक अन् परखडपणा लोकांना भावला

वरिष्ठ पदाधिकारी ही अचंबित; सांगली येथील काँग्रेस कार्यकर्त्यां मेळावा

सांगली : देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातीत  काँग्रेसच्या मित्र पक्षांनी जागा वाटपात जी चुकीची भूमिका घेतली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार न देता अचानक इतर पक्षाचा उमेदवार दिल्याने काँग्रेसच्या उमेदवारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धावपळ करणाऱे पलूस कडेगावचे भाग्यविधाते माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ. विश्कवजीत कदम यांनी ज्या युवा नेत्यांना खासदार पद सांगली जिल्ह्यातून देण्याची भूमिका बजावली होती. त्या नेत्याला डावलून इतरांना उमेदवारी दिल्याने आज डॉ विश्वजीत कदम अत्यंत आक्रमक आणि परखडपणे आपल्या वरिष्ठ पदाधिकारी नेत्यांसमोर त्यांनी घनाघात भाषण केले .हे भाषण सांगली जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलेच भावले. या भाषणाने काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी  अचंबित झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ज्या ठिकाणी आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत होते. त्या त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील खासदार हा काँग्रेसचाच खासदार असेल आणि काँग्रेसचा खासदार केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी दिलेला शब्दाचा पक्का आहे असे अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी स्पष्ट केले होते आणि तशा प्रकारची शपथ ही लोकांकडून त्यांनी घेतली होती. मात्र राजकारणाच्या खेळीमुळे सांगली जिल्ह्याची जागा शिवसेनेला दिल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली तरीही डॉ विश्वजीत कदम यांनी पायाला भिंगरी लावून गेल्या काही दिवसांपासून तसे म्हणा महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील हात आणि सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी पुन्हा काँग्रेस पक्षाचा लोकसभेसाठीचा उमेदवार जाहीर व्हावा, यासाठी  जीवाचे रान केले.

शेवटच्या क्षणापर्यंत झटणाऱ्या डॉ विश्वजीत कदम यांच्या धावपळीचा लेखाजोखा अनेकांनी अनेक माध्यमातुन पाहिला.  परंतु कुठेतरी माशी शिंकली अन् सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस सोडून इतर पक्षाला गेली याचं दुःख डॉ. विश्वजीत कदम यांना प्रचंड झालं ते आज सांगली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात  त्यांनी पोटतिडकीने, आक्रमकपणे ,परखडपणे आणि भावनात्मक होऊन स्पष्ट केले . आज खऱ्या अर्थाने हे भाषण  लोकांना चांगलेच भावले. महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते, तेही हे भाषण ऐकून अचंबित झाले. पलूस कडेगावच उमद नेतृत्व नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील बुलंद आवाज, भविष्याचा गोरगरिबांचा आधार आज तमाम जनतेने पाहिला आणि ऐकला लोक धन्य झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!