महाराष्ट्र

विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी जिल्ह्यामधील 381 संस्थांची निवड : सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना द्या

 

सांगली : विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी जिल्ह्यातील 381 संस्थांची निवड केली असून केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी केले.
केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी नुकताच सांगली जिल्हा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पणन संचालक व अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक (प्रशासन) अरूण काकडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षक) श्री. छत्रीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 संजय पाटील व संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते.
सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी सांगली मधील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना भेटी दिल्या. ‍ यामध्ये वाळवा तालुक्यातील वसंतदादा वि.का.स. सोसा.लि. येडेनिपाणी, हनुमान विकासह. सोसा. लि. कोरेगाव, चंद्रप्रभनाथ दिगंबर विविध कार्यकारी सह संस्था मर्या. आष्टा, नांद्रे सर्व सेवा सह संस्था मर्या. नांद्रे, वसगडे विकास सोसा.लि वसगडे, अंकलखोप विविध कार्यकारी सह. सोसा.लि, अंकलखोप या संस्थांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी विकास सोसायट्यांसाठी सी.एस.सी. सेंटर, जेनरीक मेडीकल, अग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्किम अंतर्गत पीक काढणीपश्चात करता येणारे उद्योग, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस वितरण, पीएम कुसुम योजना इत्यादीचा आढावा घेतला. या योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 78 संस्थांनी सी.एस.सी. रजिस्ट्रेशन केले आहे. 22 संस्थांनी त्यांचे अॅक्टीवेशन करून काम सुरु केलेले आहे. या भेटी प्रसंगी सहकार आयुक्त श्री. कवडे यांच्या हस्ते वसंतदादा येडेनिपाणी येथील केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्र सरकारकडून प्राप्त सुचनेनुसार विकास संस्थांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे 5 संस्थांनी जेनरीक मेडीकलसाठी रजिस्ट्रेशन केलेले असून अंकलखोप सोसायटीमार्फत सुरू असलेल्या मेडीकलला त्यांनी भेट दिली. केंद्र सरकारच्या अॅग्रीकल्चर इन्फास्ट्रक्चर फंड स्कीम (AIF) अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 22 प्राथमिक कृषि सहकारी संस्थांनी पीक काढणी पश्चात उद्योग यामध्ये गोडाऊन, बनाना रायपेनिंग युनिट, सोलार पॉवर प्लाँट, शुगरकेन हार्वेस्टींग मशिन, अँग्रो स्टोअरेज सेंटर, औषध फवारणीसाठी ड्रोन इत्यादी उद्योग सुरू केले आहेत. या अंतर्गत 7 कोटी 47 लाख रूपये कर्ज वाटप संस्थाना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सहकार विभागातील अधिकारी तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांची सांगली अर्बन बँकेच्या सभागृहामध्ये आढावा सभा घेण्यात आली. त्यामध्ये विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी राज्यातील 451 संस्था पायलेट प्रोजेक्टसाठी निवडण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 768 वि.का.स. संस्था असून यामधील 381 संस्थांची निवड केली असल्याचे, जिल्हा उपनिबधंधक मंगेश सुरवशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!