महाराष्ट्र

मिरज येथील अथर्व गारमेंट्स मिरज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

दिलदार व्यक्तिमत्व उद्योगपती सी आर सांगलीकर यांची उपस्थिती

 

 

मिरज  :अथर्व गारमेंट्स मिरज च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. उद्योगपती सी आर सांगलीकर यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन
व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन उद्योगपती सीआर सांगलीकर यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अशोक भटकर  यांनी पंचशील ,त्रिशरण चे अध्ययन केले . भटकर सर यांनी  संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्राचा आढावा घेतला.
विशेष करून महिलांसाठी बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य व संविधानात्मक तरतूद अतिशय मार्मिकपण सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
अथर्व गारमेंट चे कर्मचारी महिला पुरुष यांनीही  बाबासाहेबांच्या बद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले
यामध्ये अथर्व गारमेंट चे माने मास्टर यांनी बाबासाहेबांचे विचारांवर उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब कसे पुढे घेऊन जात आहे याचा प्रत्यक्षदर्शी आढावा सांगितला. अथर्व बँकेचे संचालक महेश शिवशरण यांनी बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर आपले मनोगत व्यक्त केले.
प्राध्यापक भटकर सर यांनी
जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओव्हाळ यांच्या संदर्भ पुस्तकातून महिला व कामगाराचे तारणहार
या संदर्भ उताऱ्याची झेरॉक्स ची प्रत अथर्व गारमेंटच्या जमलेल्या शे 200 महिलांना या प्रतीचे वाटप करून त्यांच्याकडून पटन करून घेतली
शेवटी या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे मंडळींचे व कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्व थोर मोठ्यांचे आभार अथर्व गारमेंटच्या डायरेक्टर व अथर्व बँकेच्या चेअरमन सौ तृप्ती घोलप मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मिरजेचे मुस्लिम समाजाचे नेते रफिक मुल्ला व काँग्रेसचे मिरज कार्यकर्ते अनिल सुगनावर तसेच महेश शिवशरण किरण पाटील सचिन इनामदार संजय पाटील संकेत खाडे व सी आर सांगलीकर फाउंडेशनचे कर्मचारी अविनाश जाधव अथर्व गारमेंट चे कर्मचारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापकीय जबाबदारी अथर्व गारमेंटचे डायरेक्टर व अथर्व बँकेचे संचालक दीपक कांबळे सर व अथर्व बँकेच्या चेअरमन सौ तृप्ती घोलप मॅडम यांनी केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!