ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मिरजेत ईद-उल-फितरची नमाज शाही इदगाह येथे उत्साहात पठण : मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

मिरज;- मिरजेत ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केले.यावेळी धार्मिक विधी प्रवचन मौलाना ब्रूहानुद्दीन यांनी केले तसेच मौलाना मुबारक ब्रूहानुद्दीन खतीब यांनी खुदबा पठण केले आणि हाफिज निजामुद्दीन संदी यांनी नमाज पठण केले.देखरेख व साफ सफाई मेहबूब आली मनेर यांनी केले. विविध सामाजिक संघटने कडून सरबत चे आयोजन करण्यात आले होते तसेच
यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मिरजेचे डी वाय एस पी प्रविण गिल्डा,मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ,खासदार संजय काका पाटील,काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा नेते विशाल पाटील,शिवसेनेचे चंद्रहार पाटील,नगरसेवक निरंजन आवटी,नगरसेवक संजय मेंढे,नगरसेवक गजानन कल्लोळी,जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम,शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव,काँग्रेस पक्षाचे आय्याज नाईकवाडी,महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबदीन शेख,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पद्माकर जगदाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार, महाराष्ट्र पब्लिकन पार्टीची युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासीर शेख, शिवसेनेचे चंदू मयगुरे, महाराष्ट्र पब्लिक पार्टीचे मिरज युवा उपाध्यक्ष साद गवंडी, पप्पू कोळेकर सहीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-उल्-फितरच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे, व भारत देश जगात बलाढ्य देश म्हणून नावलौकि व्हावे असे अल्ला चरणी प्रार्थना करण्यात आले
मिरज इदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद-उलफीतरचा सर्व भारतीयांना शुभेच्छा देले पोलीस प्रशासनाच्या वतीने एकदा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे आभार ही मानण्यात आले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!