ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभासद, वाचक, ग्रामस्थ स्नेहमेळावा उत्साहात

 

 

भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी सभासद वाचक ग्रामस्थ स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश चितळे होते यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी संचालक विश्वस्त हेही उपस्थित होते प्रारंभी केळकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास चितळे व सर्व संचालक मंडळ यांचा गिरीश पितळे , मगदूम ,जी जी पाटील यांचे हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला .तसेच लीना चितळे यांचा सत्कार सौ विद्या निकम व सौ मयुरी नलवडे यांनी केला नारीशक्ती जीवनगौरव पुरस्कार मिळाले बद्दल सौ मनीषा केळकर यांचा सत्कार ग्रंथ भेट देऊन सौ लीना चितळे यांनी केला यावेळी डॉक्टर वाळवेकर महावीर वटारे रोहित रोकडे लीना चितळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बोलताना विश्वास चितळे म्हणाले भिलवडीच्या मातीत नवनिर्मितीची क्षमता आहे म्हणूनच भिलवडीचे वाचनालय महाराष्ट्रात आदर्शवत आहे आता हे वाचनालय डिजिटल वाचनालय म्हणून कार्यरत व्हावे यावेळी श्रीयुत बी डी पाटील यांनी भिलवडी गाव वाचन चळवळीचे गाव म्हणून नावारूपास येत असल्याचे सांगितले गिरीश चितळे अध्यक्षीय समारोपात म्हणाले भिलवडी वाचनालयात लवकरच आद्ययावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे यावेळी महेश पाटील संभाजी महिंद महावीर नवले यांनी वाचनालयास कपाट भेट दिले तर अनेक सभासदांनी वाचनालयास ग्रंथ भेट दिली व गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सुभाष कवडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी देणगीदार ग्रंथ दाते यांना आभार पत्र देण्यात आली. डी आर कदम यांनी आभार मानले कार्यक्रमास डॉक्टर बाळासाहेब चोपडे प्राध्यापक धनंजय पाटील एके चौगुले डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी वाचनालयाचे सर्व संचालक भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक सभासद वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचनालयाच्या सेवकांनी संयोजन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!