महाराष्ट्रराजकीय

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची सरमिसळ : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  

 

        सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची प्रथम सरमिसळ (First Randomisation) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम नोडल अधिकारी  डॉ. विकास खरात, 281- मिरज (अ.जा.) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिपक शिंदे, 283-इस्लामपूर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, 284-शिराळा सहायक ‍निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे, 288-जत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे व ‍जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ.विकास खरात यांनी सांगली लोकसभा मतदार संघाकरीता उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) व VVPAT च्या अनुषंगाने उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३ हजार १०९ बॅलेट युनिट, ३ हजार १०९ कंट्रोल युनिट तर ३ हजार ४१० व्हीव्हीपॅट मशिन्सची सरमिसळ करण्यात आली. या सर्व मशिन्सचे विधानसभा मतदारसंघनिहाय Randomisation प्रमाणे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ‍तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

प्रथम सरमिसळच्या यादीप्रमाणे मतदान यंत्राचे विधानसभा मतदारसंघनिहाय विलगीकरण करून मतदारसंघनिहाय वितरण व वाहतूक करणे तसेच विधानसभा मतदारसंघस्तरीय स्थापित केलेल्या सुरक्षा कक्षात मशिन्स साठविण्याकामी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडील मिरज-पंढरपूर रोड जवळील गोदाम क्र. ०८ मालगाव तालुका  मिरज येथील मुख्य सुरक्षा कक्ष  गोदाम हे दिनांक ५ ते १० एप्रिल २०२४ कालावधीत उघडण्यास परवानगी प्राप्त झाली आहे. याकामी  दि. ६ ते १० एप्रिल २०२४ या कालावधीत दररोज सकाळी १० वाजता सुरक्षा कक्ष उघडणे व दररोज काम संपल्यानंतर सीलबंद करण्यावेळी राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. त्याचप्रमाणे संबंधित राजकीय पक्षांना लेखी कळविण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!