महाराष्ट्र

विटा येथे रन फॉर वोट’ साठी मॅरेथॉनचे आयोजन

        सांगली  (शिवराज शिकलगार ): – विटा ता. खानापूर येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढवणे, मतदान जनजागृती करणे आणि मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेणे यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज विटा शहरांमध्ये सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रन फॉर वोट – एक धाव मतदान जनजागृती रनचे आयोजन केले होते.

            याप्रसंगी खानापूरचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड व गटशिक्षणाधिकारी विकास राजे यांनी रन फॉर वोटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूना मतदान जनजागृतीसाठी आवाहन केले. या मॅरेथॉनमध्ये विटा शहरातील ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी त्याचबरोबर सायकल प्रेमी क्लब विटा, अल्ट्रा फिटनेस क्लब विटा त्याचबरोबर विटा हायस्कूल विटा, के.के गुळवणी माध्यमिक विद्यालय विटा मधील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. ही मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू होवून शहरातील प्रमुख रस्त्यावरून धावली. या मॅरेथॉनला सपोर्ट करण्यासाठी  प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, श्री. वाजे, केंद्रप्रमुख दिलीप कुमार सानप, नवनाथ कदम, राजेंद्र जंगम, विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री जाधव, विटा सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष सतीश शिंदे अल्ट्रा फिटनेस क्लबचे अध्यक्ष संग्राम कचरे, सागर कचरे, मिलिंद भागवत, कॅप्टन अतुल माळी, विटा शहरातील विविध फिटनेस क्लब, स्पोर्ट्स अकॅडमी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!