कोरोनाविरोधात लढ्यात गोवा सरकारला संरक्षण दलाचा मदतीचा हात :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

0

गोवा : कोरोनाविरोधाच्या लढ्यात राज्य सरकारला मदतीचा हात देण्यासाठी गोव्यातील तटरक्षक दल , नौदल,लष्कर व हवाई दलाच्या फौजेकडून यंत्रणा आणि मनूष्यबळ सज्ज ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी चर्चा करून पुढील आराखडा निश्चित करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पाटो येथील पर्यटन भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर दिली.

नाईक म्हणाले, की या बैठकीत व्हायस अ‍ॅडमिरल पी. फिलीपोस, ब्रिगेडीयर संजय रावल, तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशू नौटीयाल यांनी एकत्रीतरीत्या कोरोनाच्या संकटाशी लढा देण्याबाबत रणनिती ठरवली. राज्य सरकारला कोरोनाविरोधात लढ्यात आवश्यक असलेली सर्व मदत आणि सहकार्य दिले जाणार आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये