महाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेची 20 फेब्रुवारी रोजी सोडत

सांगली  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) सांगली यांच्या मार्फत मांतग, समाजातील 12 पोटजातीतील अंतर्भाव असणाऱ्या मांग, मांतग, मिनमादीग, मादींग, दानखणीमांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा यांची आर्थिक उन्नतीसाठी होण्यासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.             या योजनेची प्राप्त उद्दिष्टानुसार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी वेळ सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन संभाजी नगर, जुना बुधंगाव रोड सांगली येथे चिट्टीद्वारे सोडत होणार असल्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) सांगली कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!