महाराष्ट्र
माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची महाराष्ट्र राज्यातून काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची महाराष्ट्र राज्यातून काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या उमेदवारीमुळे सांगली जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये आनंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्हा भीम शक्ती संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ माने यांनीही जल्लोष साजरा केला.