आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सांगली येथे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने पोलिस अंमलदारांचे आरोग्य शिबीर संपन्न

सांगली  : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागातील पोलीस अंमलदारांचे आरोग्य शिबीर न्यू लाईफ ICU व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलविश्रामबागसांगली यांच्या वतीने घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक सचिन दंताळ यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबीरामध्ये जिल्ह्यातील 182 चालक पोलीस अंमलदारांची वैद्यकिय आणि नेत्र तपासणी केली. या शिबीरामध्ये डॉ. रविराज कांबळेडॉ. अभिमान पवारडॉ. आकाश जैनडॉ. सुरेश वाघडॉ. राहूल विसापुरेडॉ. विक्रम कोळेकर या तज्ञांनी मार्गदर्शन व मोफत सेवा दिली. ECGहिमोग्लोबीनरक्तातील साखरब्लड प्रेशरऑक्सीजनहाडामधील कॅल्शीअम तसेच डोळ्यांची तपासणी करुन मोफत सल्ला व औषधोपचार केले. यावेळी डॉ. पवार यांनी पोटविकार या विषयावर व्याख्यान दिले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!