महाराष्ट्र

समडोळी येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

            सांगली  : मिरज तालुक्यातील समडोळी येथ‍े विविध रस्ते व गटर कामांचे भूमिपूजन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जेथे जरूरी पडेल तेथे निधी दिला जाईल व विकासकामे करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.

समडोळी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूर चे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पंचायत समिती मिरज शाखा अभियंता प्रमोद शेंडगे, चंद्रकांत पाटील, दिपक मगदूम, संजय बेले, धैर्यशील मोरे, निवास पाटील, मधुकर हुबाले, संदीप सावंत, काकासाहेब धामणे आदि उपस्थित होते.

समडोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी प्रस्ताव द्या, निश्चितपणे या कामासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूर चे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, निवास पाटील, संजय बेले यांनी मनोगत व्यक्त करताना विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक दिपक मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कुडचीकर यांनी केले. आभार राजकुमार पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास समडोळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!