भिलवडी येथे स्व.काकासाहेब चितळे यांच्या स्मृतीस विविध संस्थांकडून अभिवादन ; अनेकजण भाऊक
युवा नेते, उद्योजक सतीश आंबा पाटील, मान्यवरांनी मनोगत केले व्यक्त
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष स्व.काकासाहेब चितळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विविध मान्यवरांनी आदरांजली वाहण्यात आली.
श्रीमती सुनिता चितळे,गिरीश चितळे,सौ.लीना चितळे,भिलवडी च्या सरपंच सौ.विद्या पाटील आदींसह विविध मान्यवरांनी स्व.काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.काकासाहेबांचा स्मृतिदिन
वाचन कट्ट्याचा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करीत आहोत या निमित्त वाचन चलवलीला गती मिळावी हा आमचा प्रामाणिक हेतू असल्याचे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी केले.
भू.ना.मगदूम म्हणाले की,वाचनालय,सार्वजनिक,सामाजिक संस्था सक्षमपणे चालविण्यासाठी काकासाहेब चितळे यांनी मोठी प्रेरणा आहे.
सतिश पाटील म्हणाले की,ज्या मातीतून उभारलो तिचे ऋण फेडण्यासाठी काकासाहेब व चितळे परिवार कटिबध्द आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा चालू ठेवूया.
शरद जाधव म्हणाले की,वाचन संस्काराच्या माध्यमातून स्व.काकासाहेब चितळे यांनी समाजाला योग्य वळण दिले.त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा जागर करणे हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
सुभाष कुलकर्णी म्हणाले की,काकासाहेब चितळे यांनी सामाजिक,शैक्षणिक,
वाचनालय चळवळीत क्रांती केली.
सरपंच सौ.विद्या पाटील म्हणाल्या की, कृष्णाकाठाला उभारी देण्याचे काम स्व.काकासाहेब चितळे यांनी केले.
रमेश चोपडे यांनी वाचन कट्टा या कवितेचे वाचन केले.
प्रास्ताविक व संचालन डी.आर.कदम यांनी केले.कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.जयंत केळकर यांनी आभार मानले.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत,माजी सरपंच विजयकुमार चोपडे, कृतिका वाळींबे,महावीर चौगुले,जी.जी.पाटील,ए.के.चौगुले,
डॉ.भालचंद्र कुलकर्णी, डॉ.जयकुमार चोपडे,शशिकांत कुलकर्णी,संजय कदम,प्रदीप शेटे,रमेश पाटील,सुबोध वाळवेकर,दत्ता उथले,श्रीकांत निकम,प्रमोद कुलकर्णी,बापू जोशी,हणमंत डिसले, पत्रकार आदी मान्यवरांसह नागरिक,वाचक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.