महाराष्ट्र

भिलवडी येथे ७ रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना शाखेचे उद्घाटन; युवा नेते ऋषी भैय्या टकले

तासगाव, पलूस तालुक्यात २५ शाखांचे होणार जंगी उद्घाटन : पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य

 

 

भिलवडी:- तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि एका नव्या जोषात आम्ही  बुधवार दिनांक ७ रोजी  सायंकाळी ७ वाजता हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना शाखेचा उद्घाटन समारंभ आणि पलूस तालुक्यातील २५ शाखांचा उद्घाटन समारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ऋषी भैय्या टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली 

ऋषी टकले यांनी सांगितले की,
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारी ही संघटना आहे. सामान्य कुटुंबातील लोकांना सरकारची योजनेचा लाभ मिळावा, जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आम्ही काम करणार आहे.
सामान्य लोकांच्या हक्कासाठी आमचे सर्व पदाधिकारी लढणार आहेत.
सामाजिक चळवळीत ज्या तरुणांना काम करायला आवडते त्यांना आम्ही पदावर घेतले आहे.
काम करणाऱ्यांना प्राधान्य देणार आहे..
सुशिक्षित बेरोजगार यांच्या
हक्कासाठी आम्ही लढणार आहोत.
बहुजन समाजातील तरुणांना स्थान देण्यासाठी, मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची सकारात्मक भूमिका आहे. त्यांना प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे युवकांनी त्यांच्यामागे ठाम उभे राहण्याचे आवाहन ऋषी टकले यांनी केले.

यावेळी मोहन तावदर, प्रमोद थोरात, अमीर सलामते, विकी पुजारी, राहुल कुंदे व संघटनेचे पदाधिकारी होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!