मानसिक आरोग्यासाठी कोरोना मधील करमणूक

0
मेलबर्न ऑस्ट्रेलियातील सांगलीच्या मितलीचा संदेश
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया २९ मे २०२०

लॉकडाऊनच्या वातावरणात मेलबर्नमध्ये राहणारी सांगलीची एक कन्या, डिजिटल कन्सल्टंट, रिसर्चर मिताली किशोर देसाई हिने मानसिक आरोग्यासाठी आणि आपल्या मनातील सुख-दुःख व्यक्त करण्यासाठी कोणत्याही वयात नृत्य-अभिनय हे उत्तम माध्यम आहे असा संदेश दिला आहे. आपल्या मित्र मंडळाला जमा करून तिने अंदाज अपना अपना या चित्रपटातील ये रात और ये दूरी याचा अंदाज प्रस्तृत केले आहे जे फेसबुक वर व्हायरल झाले आहे. ती म्हणते, “कोरोना मुळे जगभरात अनेक लोकांना त्रास झाला, लोकं आपापल्या परीवारापासून दूर झाले. या वातावरणात अनेकांचे जीव, आरोग्य, नाहीतर नोकऱ्याही गेल्या, माझीसुद्धा नोकरी गेली. त्याचा संताप तर होतोच पण नवी नोकरी शोधताना एकटेपण आणि बाहेरच्या जगापासून (isolation) अलगीकरण होते. अशा वेळी आपण काही नवे निर्माण करावे असे सोशल मीडियातून ही कल्पना मला सुचली. असे करत आपण एकमेकांच्या जवळ नसूनही जवळ राहू शकतो. आयुष्यातल्या अवघड संकटातून बाहेर येताना आपले परिवर्तनशील मन (flexible mind) आणि आपण स्वतःच आपले सर्वात खास साथीदार असतो. त्याचबरोबर परदेशात बरोबर आपला मित्र परिवार हाच आधार असतो.”

मिताली देसाई आणि तिचा पती, वर्धन अरोडा यांच्यासोबत मोहिनी,आभा व मांगिरिष बोर्डवेकर, अनुजा नारळकर, ऋषी चोप्रा, अक्षता व करण गुप्ता, वृषाली, एवा व केदार भाले, कृत्तिका व धवल चिटणीस हे सर्व मन लावून मजेत नृत्य आणि अभिनय करताना दिसतात. सर्वांनी आपापल्या घरात चित्रीकरण केले आणि मितलीने त्यातून कहाणी तयार करत संगणकावर स्वतः एडिटिंग केले. प्रत्येकाने आपली करमणूक आणि सर्जनशीलता वापरून लॉकडाउन आणि संपर्क तुटणे या विषयांवर विविध भूमिका निभावली. जसे नाट्य आणि नृत्य यांत आपण रंगमंचावर दुसऱ्या कलाकारांवर विश्वास ठेवतो, तसेच हा व्हिडिओ तयार करताना आणि त्यामधून सामान्य जीवनात आपण स्वतःवर आणि एकमेकांवर कसा विश्वास ठेवू, जेव्हा ते आपल्या समोर नाहीत, हा प्रश्न उभा केला आहे. कारण त्यातूनच आपले स्वभाववृत्त बाहेर येते. या माध्यमातून काय विनोदी करमणूक निर्माण झाली हे पाहायला दर्शकांना आज तर मजा आलीच पण आपल्या पुढच्या पिढीला एक आठवण राहील असा विचार यांनी केला आहे.
Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये