महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुण्यापाटोपाट कोल्हापुरच्या पत्रकारांच्या निवास प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा : दैनिक पुढारी चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांचे आवाहन

 

 

कोल्हापूर : अनिल पाटील

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या नेतृत्वाखालील मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीने शनिवारी दैनिक पुढारी चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले . डॉ जाधव यानी प्रदेशाध्यक्ष किरण जोशी ,कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे ,जिल्हा सचिव नवाब शेख ,शहराध्यक्ष नंदकुमार तेली यांच्याशी चर्चा करताना पुण्यातील पिपरी चिंचवड़ परिसरात राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकाराना अत्यंत उत्कृष्ट दर्जाची निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी राबवलेला गृहप्रकल्प आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले .कोल्हापुरात देखील असा गृहप्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले .यावेळी सागर ठाणेकर ,कु सोनिया रुकडे उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!