महाराष्ट्र

भिलवडी जायंट्सचा केरळ राज्यात डंका..!

सामाजिक कार्याचा गौरव : भिलवडी गावचा पुन्हा नवा आदर्श ; अनेकांकडून कौतुक

 

भिलवडी
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन यांचे इंटरनॅशनल ४८ वे कन्व्हेन्शन केरळ राज्यातील त्रिवेंद्रम शहरात संपन्न झाले. यावेळी देशभराच्या कानाकोपऱ्यातून तसेच मलेशिया, लंडन, मॉरिशस, आफ्रिका येथून पदाधिकारी, सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कन्व्हेन्शन हे तीन दिवसांचे होते. या कार्यक्रमाची सुरुवात आणि दीप प्रज्वलन वर्ल्ड चेअर पर्सन एन.सी. शायना यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी गोव्याचे राज्यपाल गव्हर्नर, जायंट्स वेल्फेअर चे डेपोटी चेअर पर्सन एस. पी. चतुर्वेदी आणि नुरजी सेववाला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विन्सन एम. आयपीएस फार्मर चीप इन्फॉर्मेशन कमिशनर गव्हर्मेंट ऑफ केरळ आणि सेंट्रल कमिटीचे मेंबर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रमुख व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
सांगता समारंभाच्या वेळी सन 2023 मध्ये विविध पदाधिकारी विविध ग्रुप यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सन 2023 मध्ये करण्यात आलेल्या कामाबद्दल कौतुक करण्यात आले तसेच सन 2024 मध्ये कौतुकास पात्र होण्यासाठी काहीतरी घडवावे लागेल सर्व पदाधिकारी यांनी कौन्सिल आणि कॉन्फरन्स मीटिंगमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे कोणतेही काम अवघड नसते आपली समजूत आणि विचारशक्ती तुम्हाला सर्व यशसिद्धी प्राप्त करून देऊ शकते ग्रुप म्हणून एक संघटन तुमच्या पाठीशी आहे जायंट्स म्हणून प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने या संघटनेत कार्यशील आहे सर्वांना सोबत घ्या त्यांच्या हाताला सामाजिक काम द्या त्यांना विश्वासात घ्या तुम्हाला मिळालेले एक पद एक वर्षाचे असून त्याचे चीज करा आणि सन्मान प्राप्त करा असे आवाहन करण्यात आले.
या अवार्ड गौरव सोहळ्यामध्ये आऊट स्टँडिंग सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि भिलवडी सहली यांना उत्कृष्ट काम केले बद्दल जायंट्स सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या गरजा भागवण्यापर्यंत सामाजिक काम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान, आरोग्य शिबिरे,विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक संस्थांना मदत असे उत्कृष्ट काम बद्दल त्यांना अवार्ड देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भिलवडी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुधीर गुरव आणि सहलीच्या अध्यक्षा सौ अनिता गुरव यांना अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. स्व.काकासाहेब चितळे यांनी सन 1994 मध्ये जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी ची स्थापना केली. स्थापनेपासून रक्तदान, नेत्रदान, आरोग्य शिबिरांची परंपरा आजही चालू आहे. सर्व आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम केले जातात. जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी उद्योजक गिरीश चितळे, मकरंद चितळे आणि चितळे परिवार यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. यावेळी केरळ येथे सांगली जिल्ह्यातून डॉ. जयकुमार चोपडे, डॉ. सतीश बापट, अँड विलासराव पवार, डॉ.अनिल माळी, सुहास खोत, महावीर चौगुले, सतीश चौगुले, सुबोध वाळवेकर, हसन समलेवाले, स्मिता वाळवेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात सदस्यांची उपस्थिती होती. उत्कृष्ट कार्याबद्दल परिसरामधून ग्रुपचे अभिनंदन होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!