सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा सांगली जिल्हा दौरा

0

सांगली : सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम शनिवार, दि. 23 मे रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 23 मे रोजी सकाळी 6 वाजता सिंहगड बंगला पुणे येथून रायगांव, ता. कडेगावकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता रायगांव येथील महिला क्रीडा संकुल भेट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 9.40 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणगांव बु., ता. कडेगाव येथे भेट. सकाळी 10.40 वाजता सोहोली ता. कडेगाव येथे आगमन व कोरोना संदर्भात आढावा. सकाळी 11.20 वाजता तोंडोली मार्गे भिकवडी खु. ता. कडेगाव येथे आगमन व कोराना संदर्भात आढावा. दुपारी 12.30 वाजता कॅम्प ऑफीस कडेगाव – राखीव. दुपारी 1 वाजता कडेगाव येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेमधील काँग्रेस नगरसेवकांसोबत बैठक, स्थळ – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका. दुपारी 3 वाजता पृथ्वीराज पाटील, शहराध्यक्ष, सांगली शहर काँग्रेस कमिटी आयोजित आर्सेनिक अल्बम औषध वाटप कार्यक्रम, स्थळ – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका. सायंकाळी 3.30 ते 7.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीव्दारे आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग, स्थळ – भारती विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सांगली. रात्री 8 वाजता अस्मिता बंगला, सांगली येथे आगमन व मुक्काम.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये