वाळवा तालुक्यातील जांभुळवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0

सांगली : वाळवा तालुक्यातील जांभुळवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – वाळवा तालुक्यातील जांभुळवाडी येथील 1) महादेव मंदीर चौक ते शिवाजी बापू बांदल यांचे घर, 2) शिवाजी बापू बांदल यांचे घर ते शंकर गणपती बांदल यांचे घर 3) शंकर गणपती बांदल यांचे घर ते भगवान भाऊ बांदल यांचे घर 4) भगवान भाऊ बांदल यांचे घर ते सामाजिक सभागृह 5) सामाजिक सभागृह ते महादेव मंदीर चौक, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – वाळवा तालुक्यातील जांभुळवाडी येथेे 1) शिराळा ते इस्लामपूर रस्ता (जांभुळवाडी फाटा) ते शाईनइरा पार्टीकल बोर्डस पर्यंत 2) विलास ज्ञानू गावडे मळा ते जयवंतराव रामचंद्र जांगळे यांचा मळा 3) लक्ष्मण जगन्नाथ बांदल यांचा मळा ते हिम्मत पाटील पोल्ट्रीफार्म 4) हौसराव साधू बांदल यांचा मळा ते जनाई गार्डन (मंगल कार्यालय).
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये