महापुराच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत नियोजन : पालकमंत्री सतेज पाटील

0

कोल्हापूर: गतवर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या धर्तीवर शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार तसेच संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आगामी काळातील पूरपरिस्थिती नियोजनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सविस्तर बैठक घेण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांनी दिली.

येणाऱ्या काळामध्ये दुर्दैवाने पूरपरिस्थिती उदभवली तर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या असून त्याबाबतच्या सूचना संबंधित सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफच्या तुकड्या तयार ठेवण्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कोरोना महामारीला सक्षमपणे सामोरे जात असतांना संभाव्य पूरपरिस्थितीसाठीसुद्धा जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी तयार आहे. या दोन्ही संकटावर आपण नक्कीच मात करणार आहोत गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची.

यावेळी, ना. हसन मुश्रीफ, ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, खा. संभाजीराजे छत्रपती, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबीटकर, आ. ऋतुराज पाटील, राजू (बाबा) आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. सीईओ अमन मित्तल तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये