सांगली : रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा

0

सांगली :सद्यस्थितीत लॉकडाऊन शिथिल केल्याने नियोजित शस्त्रक्रिया व विविध आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या दोन महिन्यात उपचाराअभावी रक्ताची मागणी कमी होती, पण बहुतांशी रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाले आहेत. हृदयरोग, कॅन्सर, बाळंतपण, डायलेसिस तसेच तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण, विविध आजारांचे रुग्ण आणि थॅलेसिमिया,हिमोफिलिया व सिकेलसेल या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्याने गेल्या दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर रुग्ण मोठ्या संख्येत रुग्णालयात दाखल होत असल्याने त्यांना उपचार यावेळी रक्ताची गरज भासत आहे. त्याचप्रमाणे आत्ता सुरू होणाऱ्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये रक्त व रक्तघटकांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यायी, सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मागणी वाढणार असल्याने रक्तदात्यांनी या पार्श्वभूमीवर संभाव्य उद्भवणारी रक्तटंचाई दूर करण्यासाठी स्वैच्छिक रक्तदाते, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा रक्तपेढी नोडल अधिकारी विवेक सावंत यांनी केले आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषद यांचे आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज 4500 ते 5000 रुग्णांना रक्ताची गरज भासते. रक्तदात्यांनी या पार्श्वभूमीवर संभाव्य उदभवणारी रक्त्‍टंचाई दूर करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य व आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरने करावयची स्वच्छता ,जमावबंदी व संचारबंदी असल्याने एकाच वेळी पाच पेक्षा जास्त रक्तदाते एकत्र न बोलवणे अशा सूचनांचे पालन करून स्वैच्छिक रक्तदाते, तरुण मंडळ, सेवाभावी संस्था, यांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक , डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.
शासकीय रूग्णलयात गरीब, गरजू ,अपघात ग्रस्त रूग्ण, भाजलेले रूग्ण, गरोदर माता व थॅलेसिमिया, हिमोफलिया या आजाराच्या रूग्णांना रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. शासकीस वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालये, रक्तपेढी मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीस रूग्णालय रक्तपेढी सांगली येथे सरासरी दिवसा दोन्ही मिळून 25 ते 30 पिशव्या खप होतो. या काळात खऱ्या अर्थाने शासकीय रक्तपेढ्यांना रक्ताची गरज आहे. शासकीस रक्तपेढी रक्तदान केलेल्या रक्तदात्यास शासनामार्फत रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात येते. रक्तदात्यास देण्यात येणाऱ्या कार्डावर त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी व कार्ड घेवून जाणाऱ्या व्यक्तीस संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय रक्तपेढीत व महानगरपालिका संचलित रक्तपेढीत एका कार्डावर एक अशी रक्ताची पिशवी मोफत व निशुल्क दिली जाते. आणि त्या बद्दल बदली रक्तदाताही घेतला जात नाही. शासकीय रक्तपेढीकडे रक्तदान करण्यासाठी स्वैच्छिक रक्तदात्यांना विशिष्ट शासकीय पास देण्यात येत आहे. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता अधिक माहितीसाठी 9049500097 व 9860426493 या क्रमांकावर आणि sanglicivilbb@gmail.com,gmachmirajbloodbank@gmail.com यावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये