व्यापार

सांगली जिल्ह्यात 1760 उद्योग घटक सुरू : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : सांगली जिल्ह्यात 20 मे अखेर अत्यावश्यक असणाऱ्या 1760 उद्योग घटकांना व यातील 22 हजार 036 कर्मचाऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे. यात एमआयडीसी मधील 902 उद्योग घटक व 11 हजार 285 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 858 उद्योग घटक व 10 हजार 751 कर्मचारी यांचा समावेश आहे व त्यांनी मागणी केलेल्या 381 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग, डेअरी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस,कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन, इतर- पॅकिंगशी सबंधित उद्योग, यांचा समावेश आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close