मल्हारगड आता तरी सक्रिय होणार का ?

0

एक रोप असते. ते शेळ्या मेंढ्याच्या खुराखाली दडपले जायचे. कोणीतरी एक मनुष्य त्याच्याभोवती काटेरी कुंपण करतो. त्याच्या बुडाशी आळे करतो. त्याला पाणी घालतो . मग त्याला कोंभ फुटतात. पुढे त्याचा मोठा वृक्ष होतो. आता हत्तीने धक्का दिला तरी हि ते दाद देत नाही. त्याला हत्तीचा कळप बांधला तरी हि ते दाद देत नाही……. !!! असा दाद न देणारा वटवृक्ष तयार व्हायला हवा….! महाराष्ट्राच्या राजकरणात, समाजकारणात बहजून चळवळीचा जागर करणार आणि तितक्याच ताकदीने आधार देणारं नेतृत्व आता सार्‍या महाराष्ट्राला हवे आहे. त्यासाठी केवळ विरोधाला विरोध म्हणून आपणाला चालणार नाही. अन्याला वाचा फोडलीच पाहिजे पण त्यामध्ये विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करून चालणार नाही. नाहीतर हस्ताचा पाऊस जशा धो धो कोसळतो. आणि निघून जातो. तो शेतीला जसा उपयुक्त असतो, त्याच्या पेक्षा सतत बरसणारा मृग अधिक फायदेशीर ठरतो. म्हणूनच आता समाजकारणात, राजकरणात संपूर्ण महाराष्ट्र भर नवचैतन्य फुलवणारे असाच वटवृक्ष तयार होण्याच्या मार्गावर आहे. आता फक्त बहुजन विचाराचा जागर करणार्‍या वैचारिक व्यासपीठची गरज आहे. हे आता बहुजन चळवळीतील अनेक विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी ओळखायला हवे.
अखिल भारतीय धनगर परिषदेचे संघटक मा. विजयराव गावडे यांनी आता सक्रिय व्हायला हवे. महायुतीमध्ये अनेक घटक पक्षांना एकत्र आणण्यास आपली महत्वाची भूमिका राबवली. त्यानंतर 2014 ला महाराष्ट्रात सरकारही महायुतीचे स्थापनहि झाले. पण त्यानंतर आपण कुठल्याही भाजप नव्हेतर महायुतीच्या व्यासपीठावर सुध्दा आला नाही. गेली 30 वर्षे आपण काम करत आहात. पुन्हा एकदा वैचारिक चळवळीची गरज आणि सामाजिक राजकीय वैचारिक कूटनीतीची आवश्यकता आहे. अन्यथा आपला बहुजन विचाराचे व्यासपीठ असणारे मल्हारगड (विजय गावडे यांचे निवासस्थान) काय कामाचे. सामजिक बहुजन चळवळीचे रक्त तुमच्यातआहे. ती विचारधारा पुन्हा एकदा जागी करायला हवी. नाहीतर धो धो कोसळणारा हस्ताचा पाऊस असाच बिनकामचा कोसळून जाईल. पुन्हा आपले स्वप्न अपुरेच राहील. कधीतरी आपला माणूस त्या लोंकाचे कल्याण करणार्‍या काटेरी खुर्चीवर बसायला हवा. त्यासाठी आता आपणाला नवा डाव मांडायला हवा. त्यादिशेने पावले उचलायला हवीत. त्यासाठी अगोधर आपला मल्हारगड सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. मागचा इतिहास आता पुन्हा स्मरून पुन्हा भरारी मारायला हवी. मग आपला मल्हारगड कधी सक्रिय करताय. गरज आणि पुढील धोके ओळखून आता सक्रिय व्हायला हवे.

-आनंदा टकले

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये