माणुसकीने भरलेले रसायन म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब : भाऊसाहेब दुधाळ

0

” माणूस म्हटले कि जगणं आणि नवा अनुभव घेणं हे आलेच. जीवन आणि मृत्यू या दोन टोकांच्या अंतरावर आपल्या जीवनाचा प्रवास ठरलेला आहे. या प्रवासात आपणास अनेक माणसे भेटतात . त्यात कधी रक्ताची तर कधी माणुसकीने जोडलेली नवी नाती दिसतात. असेच माणुसकीच्या नात्याने आमच्या काळजावर कोरलेले नाव म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब….!

ज्या वयात खेळायचं बागडायचं त्या वयात घराची जबाबदारी पेलणारा आणि आम्हासारख्या नवयुवकांना जिद्द, चिकाटी, संघर्षाने आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सतत धडपडणारे एक आगळं आणि इतरांना विचार करायला लावणारं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब……! कॉलेज जीवनात असताना गोपीचंद पडळकर साहेब यांनी स्वतः चा व्यवसाय पाहत शिक्षण घेतले. वेळप्रसंगी स्वतःच्या धाब्यावर रोट्या भाजायला त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. बैलगाडीचा छंद त्यांचा न्यारा…! ढोलाचा नाद ऐकताच अंगात वीज संचारल्यागत गोपीचंद पडळकरसाहेब ढोलाचा नाद आसामांत धुमधुमायचे,…! संघर्ष हा गोपीचंद पडळकरसाहेब याच्या पाचवीलाच पुजलेला…..! पण ते कधीच भ्यायले नाहीत….नियतीला ठक्कर देत स्वतःच्या शैलीत जीवन जगणारे आणि नियतीचाही काळजाला कारुण्याचा पान्हा फुटेल अशी धडक देणारे गोपीचंद पडळकर साहेब आमदार झाले आहेत….! आज त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या की मन दाटून येते. गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासोबत मिळालेल्या सहवासामुळे मन भारावून गेले आहे . गोपीचंद पडळकर साहेब यांच्याविषयी जुन्या अनेक आठवणी मनात तरळल्या तरी माझे डोळे ओले होतात.

माझी आणि गोपीचंद पडळकर साहेब यांची जिवाभावाची मैत्री….! अगदी सख्या भावाप्रमाणेच….! आमचे आणि गोपीचंद पडळकर साहेब यांचे कौटुंबिक सबंध अगदी जीवाभावाचे म्हणूनच अनेक अडचणीच्या प्रसंगात एकमेकांच्या विचारात आम्ही वाहन गेलो. नागजच्या फाट्यावरती गोपीचंद पडळकर साहेब यांचा ढाबा. आणि येथे आमची मैत्री जमली. एकमेकांचे जिगरी दोस्त झालो . कॉलेजच्या जीवनात सुद्धा गोपीचंद पडळकर साहेब यांची सावली बनून त्यांच्या सुखदुःखात सामील असायचो. ” बोलण्याची अदा पाहून मीच त्याच्यावर फिदा झालो . गोपीचंद पडळकर साहेब यांचे बोलणे ऐकले कि मेंदूच्या अनेक शिरा ताड्कन तडकायच्या. मनाने खूपच श्रीमंत असणारे गोपीचंद पडळकर साहेब …! जीवाला जीव देणारे अन मनाने हळवे सुद्धा…! गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मनात एकदा माणूस भावला कि त्या माणसाला कधीच अंतर त्यांनी दिलेले मी पाहिले नाही. एकदा शब्द दिला कि दिलेला वचनाला जागणारा हा काळजातील माणूस… कधी जिवाभावाचा होऊन गेला मला समजलेच नाही. अथक परिश्रम करण्याची जिद्द आणि अफाट धाडसीवृत्तीमुळेच ५ पराभव पचवून पुन्हा उभे राहण्याची मानसिकता फक्त गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडेच …! मनसोक्त विहिरीत डुंबणारे , बैलगाडीचा घुंगरू साऱ्या रस्त्याने वाजवीत गाडी चालविणारे, स्वतः दुःखात असले तरी इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा गोपीचंद पडळकर साहेबासारखा नेता मी कधीच आयुष्यात पाहिलेला नाही. कोणतेही कष्ट करण्याची जिद्द अगदी ठासून भरलेली आहे म्हणूनच वेळप्रसंग ओळखून स्वतःच गोपीचंद पडळकर साहेब धाब्यावर रोट्या भाजायचे. अफाट इच्छाशक्ती असलेला जिवाभावाचा मैतर गोपीचंद पडळकर साहेब आज आमदार झालेले पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. गळ्यात ढोल अडकवून ढोलचा नाद दाहीदिशांना घुमवणारे , तर कधी ओव्याचा, कधी गजीनृत्याचा ताल भरवणारे गोपीचंद पडळकर साहेब यांनी आम्हाला आत्मविशास काय असतो हे दाखवून दिले. राजकारणात, समाजकारणात काहीही होऊ शकते. फक्त आपल्याजवळ संयम असायला हवा यांची जाणीव करून दिली. कॉलेजला असताना जुन्या व्हिक्टर गाडीने आम्ही फिरायचो. अनेक भाषणे ऐकायचो. असेच एकदा नितीन बानुगडे पाटील यांचे भाषण ऐकले. असा वक्ता आपण अहिल्यादेवींच्या जयंतीला आणण्याचा ठरवले. त्यावेळी आमच्याकडे नितीन बानुगडे पाटील याना फी द्यायला पैसे नसायचे. त्यासाठी पैसे गोळा करण्याचा आम्ही सपाटाच लावला. एकदा सांगलीतील कोळेकर नगरसेवकाला भेटायला दोघेही व्हिक्टर गाडीने गेलो. घरात गेलो. कार्यक्रमास देणगी मागितली. नगरसेवकाने उत्तर दिले… “माझ्या पोराची परीक्षा चालू आहे…त्यामुळे मी जरा अडचणीत आहे…” हि आठवन दोघांच्या लक्षात आली कि आम्हाला समाजातील अनेक नमुने कसे असतात याची आठवण यायची. व्हिक्टर गाडीने अण्णासाहेब डांगेंना आम्ही भेटायला जायचो. त्या व्हिक्टर गाडीने आम्हाला खुप साथ दिली. महादेव जानकर साहेबांचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला. महादेव जानकरसाहेबांच्या विचारांचा प्रभाव गोपीचंद पडळकर साहेबांवर …! त्यांच्यासाठी खूप मोठे कष्ट त्याने घेतले, रासपच्या गावा-गावात शाखा निर्माण केल्या. गोपीचंद पडळकर साहेब यांना डॉकटर व्हायचे होते. पण नियतीने त्यांना डॉक्टर होऊ दिले नाही पण झेलची हवा मात्र खायला लावली. मी आणि ब्रम्हा शेट सकाळी लवकर उठून रेल्वे पकडायचो. बेळगाव गाठायचो. जामीन मंजूर होऊ पर्यंत आमचा प्रवास सुरूच होता. तीन महिन्यानंतर झेलमधून गोपीचंद पडळकर साहेब याना जामीन मंजूर झाला. बाहेर येताना झेलमधील अनेक कैदी रडताना मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. बेळगावला झेलमध्ये असताना तीन महिन्यात कैदयांना सुद्धा रडायला लावणारा माणूस कसा असेल…! गोपीचंद पडळकर साहेब याच्या काळजात फक्त माणुसकीचे रसायन भरले आहे…! हीच माणुसकी त्यांच्या मनात कायम भरलेली आहे ती कधीही गोपीचंद पडळकर साहेब यांना शांत बसू देत नाही. राजकारणात आल्यावर अनेक खोट्या केसेस त्यांच्यावर विरोधकांनी घातल्या. पण गोपीचंद पडळकर साहेब तसूभरही मागे हटले नाहीत . दु:ख, यातना, वेदना, अडचणी, समस्या, दुष्काळ, तहानलेली माणसे पाहून, सावकारकीचा तमाशा पाहून गावगाड्यातील बहुजन युवकाला गोपीचंद पडळकर साहेब यांनी जागे केले . १२ वर्षाचा वनवास गोपीचंद पडळकर साहेब भोगला. ५ पराभव त्यांनी पचवले. मंगळसूत्र चोरीची खोटी केस गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर दाखल झाल्यावर त्यांनी अनवाणी पायाने चिपळूण गाठले. पण ते घाबरले नाहीत. अनेक गावात त्यांनी एकोपा निर्माण केला. सारी गावे एकमुखाने नांदू लागलेली आम्ही डोळ्याने पाहिली आहेत. गोपीचंद पडळकर साहेब यांचा मंगळसूत्र चोरीच्या केसवरील जामीन मंजूर झाल्यावर सांगली ते आटपाडी गाड्याची काढलेली रॅली, फटाक्याची आतिषबाजी पाहून खरंच न्यायदेवता अजून जिवंत आहे यांची प्रचिती त्यावेळी आम्हाला आली. अनेक सुख-दुःखात सामावून जाणारा खरा नेता गोपीचंद पडळकर साहेबच ….! वाखाणण्याजोगे वक्तृत्व, धाडसी वृत्ती आणि माणसाला माणूस जोडणारी त्यांची नजर म्हणूनच आज महाराष्टातील बहुजन युवकांच्या काळजावर गोपीचंद पडळकर साहेब यांचे नाव कोरले गेले आहे. १२ वर्षाच्या तपाचे आज फळ मिळाले आहे. त्यांना मिळालेली आमदारकी हि गावगाड्यातील सामान्य युवकांना न्याय आणि आनंद देणारीच आहे. म्हणूनच आज आम्हाला अपार असा आनंद झाला आहे. गोपीचंद पडळकर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन…! पुढील राजकीय वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा….!

-भाऊसाहेब दुधाळ

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये