महाराष्ट्र

वसगडे येथे माजी सहकार डॉ विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात

महेंद्र (आप्पा) लाड व मान्यवरांची उपस्थिती : लोकांमध्ये समाधान

 

वसगडे : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री मा.आ.डॉ. विश्वजित कदमसाहेब व मा. श्री. महेंद्र (आप्पा) लाड (संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक) यांचे शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती सर्वश्री अमोल पाटील (माजी पं.स. सदस्य ), सौ. वृषाली काशीद ( सरपंच), अनिल पाटील (उप सरपंच), रावसाहेब पाटील (चेअरमन), संजय गायकवाड (चेअरमन-प्रकाश ग्रुप सोसायटी), नंदू दादा कदम, परशुराम यादव,उदयकुमार पाटील, दत्तात्रय चव्हाण,राजेंद्र यादव.ग्रामपंचायत सदस्य, इतर संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकास कामांची नावे-
1) पाचवा मैल – माळवाडी रस्ता ते हजारे मळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (भूमिपूजन)
रक्कम – 7 लक्ष
योजना – जणसुविधा
2). पाचवा मैल – माळवाडी रस्ता ते खोकडे मळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (भूमिपूजन)
रक्कम – 8 लक्ष
योजना – आमदार फंड
3) बौद्ध समाजासाठी समाज मंदीर बांधणे. (भूमिपूजन)
रक्कम – 10 लक्ष
योजना – दलीत वस्ती सुधारणा
4) आयुर्वेदिक व युनानी दवाखाना बांधणे. (लोकार्पण)
रक्कम – 61 लक्ष
योजना- जिल्हा नियोजन
5) आयुर्वेदिक दवाखाना ते महावीर फकीर घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (लोकार्पण)
रक्कम – 10 लक्ष
योजना – आमदार फंड
6) वसगडे रेल्वे गेट ते वसगडे कमान रस्ता रुंदीकरण व दोन्ही बाजूस आर. सी. सी. गटार करणे. (भूमिपूजन)
रक्कम – 3 लक्ष
योजना – बजेटएकूण कामांची रक्कम – 396 लक्ष असे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

या विविध विकासकामांच्या उद्घाटनामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!