महाराष्ट्र

सांगली येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन

 

       

        सांगली : आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, सागर दळवी, नागेश वरूडे व प्रदीप थोरात उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुरले येथे झाला. त्यांनी त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!