महाराष्ट्र

सांगली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन दिनदर्शिकेचे प्रकाशन

 

सांगली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या प्रेरणेने रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे यांनी प्रकाशित केलेल्या रिपब्लिकन दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयची राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांनी “रिपब्लिकन दिनदर्शिका” छापल्याबद्दल विशाल तिरमारे यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात, युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे, संजयरावजी कांबळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य पोपट नाना कांबळे, युवा नेते नानासाहेब वाघमारे, मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर,रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.*

*यावेळी बोलताना आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माजी महापौर कालकथीत विवेकरावजी कांबळे साहेब यांचे आकस्मित दुःखद निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस ही “रिपब्लिकन दिनदर्शिका” अर्पित करीत आहोत. “रिपब्लिकन दिनदर्शिका” पाच हजार प्रति मध्ये छापली आहे. पलूस कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील दिन दलीत बहुजन समाजातील लोकांना, तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय, व्यापारी वर्ग यांना “रिपब्लिकन दिनदर्शिका” मोफत वाटण्यात येणार आहे. रिपब्लिकन दिनदर्शिका छापण्यामागे एकच उद्देश असून केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष व पक्षाचे नाव घराघरात पोहोचवण्याचा मानस आहे. “रिपब्लिकन दिनदर्शिका” छापण्यासाठी ज्या ज्या संस्था व मित्रपरिवाराने सहकार्य केले त्या सर्वांचे आभार आरपीआयचे नेते विशाल तिरमारे यांनी मांनले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!