महाराष्ट्र

भीमा कोरेगाव शौर्य दिन हा धगधगता इतिहास : माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे ; आष्टा येथे भीम शक्ती कडून “रणांगण १८१८” चे आयोजन

उद्योगपती सी आर सांगलीकर यांची उपस्थिती : "रणांगण १८१८" नाटिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

आष्टा : पेशव्यांच्या काळामध्ये दलितांवरील अन्याय मोडून करण्याचे काम केवळ 500 महार लोकांनी 25000 पेशव्यांची कत्तल करून केले. भीमा कोरेगाव शौर्य दिन हा धगधगता इतिहास आहे, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी केले.
आष्टा येथे भीमशक्ती संघटनेतर्फे आयोजित केलेल्या रणांगण 18 18 या नाटिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे म्हणाले, अनादी कालापासून दलितावरील अन्याय हा होत आलेला आहे. पेशवाईच्या काळातही कमरेला झाडू आणि मानेला मडके होते, हा अन्याय जोखडातून मुक्त करण्यासाठी केवळ 500 महार लोकांनी 25 हजार पेशव्यांची कत्तल करून केला. यानंतरच्या काळात घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील तमाम दलित, बहुजन लोकांना माणसात आणले. बाबासाहेबांची पुण्याई आम्ही कदापि विसरणार नाही. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून भीमशक्ती संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून अनेक पीडित लोकांना न्याय दिला, मदत केली. भीमशक्ती ही संघटना राजकीय नसून ती समाजहिताचीसाठी संघटना आहे. समाज कल्याण मंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील बहुजन लोकांना न्याय देण्याची भूमिकाच मी बजावली. यापुढे भीमशक्तीचा संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ पदाधिकारी याच्या माध्यमातून मी माझ्या समाजाची सेवा करीन, असेही हांडोरे यांनी सांगितले.

उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी ही भीमा कोरेगाव शौर्य दिनाची माहिती सांगितली.

यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष डॉ सुशील गोतपागर यांनी मनोगत व्यक्त केले.
“रणांगण १८१८” नाटिकेतील कलाकारांनी अत्यंत देखणी अशी भूमिका बजावली. प्रत्येक पात्रांमध्ये कलाकारांनी जाण्याचा प्रयत्न केला. या नाटिकेला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

सांगली जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ माने यांनी माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे तसेच उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा सत्कार केला.

यावेळी विनय कांबळे, भीमशक्ती संघटना मुंबई अध्यक्ष शशिकांत बनसोडे, संपर्कप्रमुख एन के कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे नेते राम मधाळे, शुभम बनसोडे, सुभाष माने, प्रमोद कुदळे संजय कांबळे, संजय कांबळे यांच्यासह विविध भागातील भीम शक्ती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!