महाराष्ट्र

भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा दारु नको दूध प्या ” संदेश

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग , सांस्कृतिक विभाग व आय.क्यू.ए.सी . विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” दारु नको दुध प्या ” या व्यसन मुक्तिच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे मा. जगन्नाथ माळी , माजी न्यायाधीश यांनी वरील उद्‌गार काढले . यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे डॉ. सुनिल वाळवेकर , सचिव, मानसिंग हाके . राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. व्ही . एस. विनोदकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव पाटील , प्रा. डॉ .एस.डी. कदम , क्रांतीसूर्य न्यूजचे श्री . शशिकांत कांबळे , दैनिक बंधुताचे श्री. पंकज गाडे उपस्थित होते .
यावेळी प्रमुख पाहुणे माजी . न्यायाधीश जगन्नाथ माळी म्हणाले की, चांगले जीवन हा चांगल्या व निरोगी आरोग्याचा मंत्र आहे . म्हणून सर्वांनी चांगले जीवन जगण्यासाठी विविध अंमली पदार्थापासून निर्माण होणारी व्यसने सोडावीत कारण दारुमुळे होणारा फॅटी लिव्हर सारख्या आजारावर उपलब्ध नाहीत . म्हणून ती व्यसने सोडून वाचन, लेखन चिंतन , मनन यासारखे छंद जोपासावे असे ते म्हणाले .
गुटखा , तंबाखू , मावा यासारखी व्यसने करताना तोंडातील लाळ जी पचनक्रियेला मदत करते तीच लाळ बाहेर टाकल्यामुळे पचनक्रिया बिघडते व अनेक रोगांना संधी मिळते म्हणून व्यसनापासून दूर राहा .
जोपर्यंत माणूस अमंली पदार्थांपासून दूर होत नाही तोपर्यंत अमंली पदार्थ समाजातून नष्ट होणार नाहीत . प्रत्येक गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग केल्यास जीवन समृद्ध होते . असे ते म्हणाले .
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब चोपडे म्हणाले की, माणसाला व्यसने असावीत पण ती व्यसने जीवनाचे कल्याण करणारी असावीत . असे ते म्हणाले
तत्पूर्वी व्यसन मुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली महाविदयालय , बाजार गेट , मधली गल्ली , पंचशील व साठे नगर ‘ निकम गल्ली , पाटील गल्ली मार्गे हनुमान मंदिराजवळ विसर्जित करणेत आली .
यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. व्ही.एस . विनोदकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. आर. एच भंडारे यांनी केले शेवटी आभार प्रा. एस.एस. पाटील यांनी मानले . या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनी , प्राध्यापक , शिक्षकेत्रर कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते . या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे , उपाध्यक्ष मा.डॉ. बाळासाहेब चोपडे संस्था सचिव मानसिंग हाके यांचे मार्गदर्शन लाभले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!