आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शिरोली दूमाला येथील विश्वास पाटील फौंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे प्रतिपादन

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

.शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई पाटील यांच्‍या चौदावा स्‍मृतिदिन रविवार दि.१७/१२/२०२३ इ. रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्‍तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले कि, सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून अशा अडचणीच्या काळात आईच्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्‍तदान हे श्रेष्‍ठदान’ ही संकल्‍पना घेवून १४ वर्षे रक्‍तदान शिबीर घेणेत येत आहेत हि एक जनसेवाच आहे, विश्वास पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी पाटील फौंडेशनच्या माध्यमातून चांगले सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे निश्चितच त्यांचे कार्य अनुकरणीय आहे. रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकते. याचे पुण्य विश्वास पाटील यांच्या कुटुंबीयांना लाभेल असे ते गौरवोद्गार मंगेश चिवटे यांनी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराच्या उदघाट्नप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी काढले. तसेच वैद्यकीय कक्षातून अर्थसहाय्य कसे मिळवावे याची सविस्तर माहिती यावेळी दिली.

राज्यातील आरोग्य सेवा सुविधाचा लाभ गरजू रुग्णांना व्हावा यासाठी विश्वास नारायण पाटील फौंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षासाठी २५ हजारांचा धनादेश चिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावर्षी शिबीराचे १४ वर्ष असून या शिबीरामध्ये विक्रमी ३५५ लोकांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये महिलांनी रक्तदान केले. तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीराचा ५५० लोकांनी लाभ घेतला. एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूल शिरोली दु. या शाळेच्या विदार्थ्यांचा शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

यावेळी कोल्हापूर वैद्यकीय कक्ष समन्वयक प्रशांत साळुंखे यांचे मनोगत झाले. स्वागत अनिल सोलापुरे यांनी केले. तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, अजित नरके, बाळासाहेब खाडे, किसन चौगले, मुरलीधर जाधव, शशिकांत पाटील, कर्णसिंह गायकवाड, बयाजी शेळके, चेतन नरके, राजेंद्र मोरे, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, कुंभी कारखाना संचालक किशोर पाटील, भोगावती कारखाना संचालक अविनाश पाटील,सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील,नंदकुमार पाटील, माधव पाटील, एस.के.पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, गावातील व भागातील मान्यवर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!