महाराष्ट्रक्रीडा

कोल्हापूरातील महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवास प्रारंभ

 

कोल्हापूर ः अनिल पाटील

येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर या शाळेत क्रीडा महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.निलिमा अडसूळ, तालुका क्रिडा अधिकारी श्री. अभय देशपांडे व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन श्री के.जी. पाटीलसाहेब उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये विविध खेळांची जोपासना केली जाते. या खेळामधून विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार व सांघिक भावना रुजवण्याचे काम केले जाते. खेळाल तर जीवनात यशस्वी व्हाल, मानवी जीवनात खेळाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
खेळाने सांघिक भावना विकसित होते, महाराष्ट्र हायस्कूलच्या मातीत राष्ट्राला अभिप्रेत असणारे आदर्श नागरिक व प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचे सामर्थ्य आहे. या शाळेतून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंची संख्या पाहता निश्चितच क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे किंबहुना राज्याचे भविष्य चांगले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळमॅडम यांनी व्यक्त केले. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे किटस परिधान केले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंनी क्रीडाज्योत घेऊन मैदानाला फेरी मारली. या स्पर्धेमध्ये सांघिक क्रीडा प्रकारात फुटबॉल, व्होलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, खो- खो, कबड्डी तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, उंच उडी व लांब उडी या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेचे खजाननीस वाय.एस. चव्हाण, संचालक सर्वश्री आर. डी. पाटील, पी.सी. पाटील, विनय पाटील, वाय. एल. खाडे, संस्थेच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख, कॉलेजचे उपप्राचार्य यु. आर. आतकिरे, पर्यवेक्षक एस. ए.जाधव, एस. व्ही. शिंदे, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री एस. एस. पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री एस. एस. मोरे यांनी मांडले. वार्षिक क्रीडा अहवाल वाचन क्रीडा विभाग प्रमुख श्री व्ही.जी.चोपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री संदीप पाटील यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!