महाराष्ट्र

अंकलखोप-भिलवडी येथे बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ वे महापरिनिर्वाण दिनी अभिवादन : हजारोंची उपस्थिती

 

अंकलखोप / भिलवडी :-
अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्यास महापरिनिर्वाण दिना निमित्त विविध मान्यवरांनी स्मृर्ती स्थळाला भेटംदेऊन अभिवादन केले.
वंचित माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी हजारो अनुयायांनी अंकलखोप ता. पलूस येथील बाबासाहेबांच्या स्मृती स्थळास अभिवादन केले.

भिलवडी ग्रामपंचायत, माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय भिलवडीसह विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या अंकलखोप (ता. पलूस ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच सांगली जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेरील भीम अनुयायी मोठया संख्येने अंकलखोपमध्ये येत असतात. भीम अनुयायांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते मंडळीनींही बाबासाहेबांना अभिवादन केले. सकाळी लहान मुले, मुली व महीलांनी त्रिसरण पंचशीला ग्रहण करून अभिवादन केले. पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने, अंकलखोपचे सरपंच राजेश्वरी सावंत, उपसरपंच रोहिणी चौगुले, सर्व ग्रां. पं. सदस्य, भिलवडी पोलिस स्टेशनचे सपोनि नितीन सावंत, जिव्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगांवकर, दयानंद कांबळे यांनी स्मृती स्थळास भेट देवून बाबासाहेबांना अभिवादन केले. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही येणाऱ्या सर्व अनुयायांची भोजन व इतर व्यवस्था जयभिम मित्रमंडळ व ग्रामपंचायत अंकलखोप यांच्या वतीने करण्यात आली होती. दिवसभर परिसरातील वातावरण भीममय झाले होते. सर्वत्र निळे वादळ आल्याचे जाणवत होते. अंकलखोप बरोबरच भिलवडी, माळवाडी, नागठाणे सह परिसरामध्ये मोठया विनम्रतेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!