महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

उद्योगपती गिरीश चितळे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडीस एक लाख 35 हजारांची देणगी प्रदान : गिरीश चितळे यांचा सन्मान ;48 वा वाचन कट्टा उत्साहात

 

भिलवडी : चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती आणि सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेचे अध्यक्ष मा गिरीश चितळे यांनी त्यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेत एक लाख 35 हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान केली. वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी या देणगीचा धनादेश स्वीकारला या बहुमोल देणगी बद्दल वाचनालयाचे वतीने गिरीश चितळे यांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे विश्वस्त जी जी पाटील आणि ज्येष्ठ संचालक भू ना मगदूम यांचे हस्ते शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन हा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या देणगीचा विनियोग वाचनालयाची अभ्यासिका अध्यायावत करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती सुभाष कवडे यांनी दिली. चितळे कुटुंबीयांनी वाचनालयास नेहमीच सर्व प्रकारचे मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले. या दरम्यान वाचनालयाचा 48 वा वाचन कट्टा ही संपन्न झाला. माझे दिवाळी अंकांचे वाचन या विषयावर डी आर कदम, रमेश चोपडे, जयंत केळकर, उर्मिला डिसले, हनुमंतराव डिसले, मोकाशी सर, जी जी पाटील गुरुजी, भू ना मगदूम, सुभाष कवडे आणि स्वतः गिरीश चितळे यांनी वाचलेल्या दिवाळी अंकांची माहिती दिली . तसेच दिवाळी अंकांचे वाचन उपयुक्त असल्याचे सांगितले. याच दरम्यान आटपाडी येथे संपन्न झालेल्या स्वर्गीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाचन आकलन उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व भिलवडीतील वाचकांना सन्मान चिन्ह देऊन गिरीश चितळे यांचे हस्ते गौरविण्यात आले.
कर्मवीर पतसंस्थेचे वतीने वाचनालयास एके चौगुले नाना यांचे हस्ते दीपोत्सव दिवाळी अंक यावेळी भेट देण्यात आला.
संयोजन व सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.

याप्रसंगी भिलवडी शिक्षण संस्थेच्या 7500 ग्रंथ संकलन उपक्रमात वाचनालयाचे वतीने पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमास वाचक ग्रामस्थ बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!